

पुढारी ऑनलाईन डेस्क
अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D'Cruz) सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. इलियानानं बीचवरील तिचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेत. एका फोटोत ती बिकिनीत दिसत आहे. इलियानानं पेस्टल पर्पल कलरची बिकिनी परिधान केली आहे. त्यात ती फ्रेश मूडमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटोत इलियाना बोल्ड लूकमध्ये दिसत असून तिने समोर हॅट पकडली आहे. हॅटवर 'Do Not Disturb' असे लिहिलेले दिसते. यावर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
'तू सर्वांत सुंदर अभिनेत्री असून असं सौंदर्य मी कधीचं पाहिलं नाही. तू भारताची एक अष्टपैलू अभिनेत्री आहेस.' अशी कमेंट एका चाहत्याने तिच्या फोटोवर केली आहे.
इलियानानं (Ileana D'Cruz) याआधी रेड आणि व्हाइट बिकिनीतील फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तिने विमानतळावरुन बीच पर्यंत जाण्याचा प्रवास दाखविला आहे. मलायक अरोरा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडिओला लाइक्स केले आहे. दुसऱ्या एका फोटोत इलियाना रेड बिकिनीत स्विमिंग पूलाजवळ पोज देताना दिसत आहे.