दु्र्दैवी! पाईट येथे सर्पदंशाने तिसरीतील विद्यार्थ्याचा मृत्यू | पुढारी

दु्र्दैवी! पाईट येथे सर्पदंशाने तिसरीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : पाईट, ता खेड येथील निवडुंगवाडी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय विद्यार्थ्यांचा सर्पदंश झाल्याने मृत्यु झाल्याची घटना घडली.रोहन शरद डांगले असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. उन्हाळा आणि परीक्षा यामुळे शाळा सकाळी सुरू आहेत. शनिवारी (दि २०)सकाळी शाळा भरल्यावर मधल्या सुटीला सगळे विद्यार्थी बाहेर पडले.लघुशंकेला गेल्यावर रोहनला सर्पदंश झाला. त्याच्या लक्षात आल्यावर त्याने शिक्षकांना सांगितले. त्याला पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांना साप चावल्याचे आढळले नाही.

रोहनची अवस्था पाहून त्याला पुढे नेण्यास सांगण्यात आले. चांडोली ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करायला आणले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याची माहिती अधीक्षक डॉ पुनम चिखलीकर यांनी दिली. रोहनच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. उन्हाचा कडाका वाढला आहे. गर्मीचे वातावरण असल्याने साप बाहेर पडण्याचे प्रमाण या काळात जास्त असते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची व मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन डॉ चिखलीकर यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button