फलटणची जांभळे पुण्याच्या बाजारात..! | पुढारी

फलटणची जांभळे पुण्याच्या बाजारात..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रानमेवा म्हणून ओळखले जाणार्‍या जांभळांची गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात आवक सुरू झाली आहे. गुरुवारी बाजारात फलटण येथून 27 व 11 किलोच्या दोन क्रेट्समधून जांभळे विक्रीसाठी बाजारात दाखल झाली. घाऊक बाजारात त्याच्या दहा किलोला 2 हजार 500 ते 3 हजार भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात एक किलो जांभळाची 400 ते 500 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

फलटण येथील शेतकरी सुनील शिंदे यांच्या शेतातून शिवाजी बबनराव भोसले यांच्या गाळ्यावर आवक झाली. साधारण मार्चच्या शेवटच्या टप्प्यात जांभळाचा हंगाम सुरू होतो. यंदा पाण्याचे दुर्भीक्ष मोठ्या प्रमाणात असल्याने हंगाम 20 दिवस उशिरा सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, मालाचा दर्जाही खालावला आहे. पाण्याअभावी टपोर्‍या जांभळांचेही प्रमाण कमी असून, गतवर्षीच्या तुलनेत दर टिकून असल्याचे जांभळाचे व्यापारी शिवाजी भोसले यांनी नमूद केले.

हेही वाचा

Back to top button