शहरात आता अवजड वाहनांना बंदी; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा अवलंब | पुढारी

शहरात आता अवजड वाहनांना बंदी; 'या' पर्यायी मार्गांचा करा अवलंब

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने अवजड वाहनांना बंदी घातली आहे. येत्या शनिवार दि. 23 पासून बाहेरून येणार्‍या जड वाहनचालकांनी शहरात न येता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. सोलापूर रस्ता, नगर रोड, सातारा रोड, मुंबई रस्ता, नाशिक रोड, सासवड रोड आळंदी रोड, यांसह इतर रस्त्यांवरून शहरातून मार्गक्रमण करणार्‍या सर्व प्रकारच्या जड व अवजड मालवाहतूक करणार्‍या ट्रक व इतर वाहनचालकांना बंदी घालण्यात आली आहे.

  •  नगर रोडवरून पिंपरी-चिंचवड, मुंबईकडे जाणार्‍या व येणार्‍या वाहनांकरिता खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पूल मार्ग बंद केला आहे.
    पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी शिक्रापूर, चाकण, तळेगावमार्गे इच्छितस्थळी जावे.
  • अहमदनगर रोडवरून साता-याकडे जाणार्‍या व येणार्‍या वाहनांकरिता खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, सासवड रोडने मंतरवाडी फाटा चौक,
    खडी मशिन चौक, कात्रज चौक मार्ग बंद केला आहे.
    पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी लोणीकंद, केसनंद, थेऊर, थेऊर फाटामार्गे इच्छितस्थळी जावे. तसेच, शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला, लोणंद किंवा सुपा, जेजूरीमार्गे इच्छितस्थळी जावे.
  •  अहमदनगर रोडवरून सोलापूरकडे जाणार्‍या व येणार्‍या वाहनांकरिता खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, हडपसर मार्ग बंद केला आहे.
    पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुलामार्गे इच्छितस्थळी जावे.
  •  सोलापूर रोडवरून साता-याकडे जाणार्‍या व येणार्‍या वाहनांकरिता हडपसर, मंतरवाडी फाटा चौक, खडी मशिन चौक, कात्रज चौक मार्ग बंद आहे.
    पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी केडगाव चौफुला, लोणंदमार्गे इच्छितस्थळी जावे.
  •  सोलापूर रोडवरून अहमदनगर व नाशिककडे जाणार्‍या व येणार्‍या वाहनांकरिता हडपसर, मगरपट्टा रोड, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पूल मार्ग बंद केला आहे.
    पर्यायी मार्ग :- वाहनचालकांनी थेऊर फाटा, थेऊर, केसनंद, लोणीकंद, शिक्रापूरमार्गे इच्छितस्थळी जावे . तसेच, वाहनचालकांनी केडगाव चौफुला, नाव्हरा, शिरूरमार्गे इच्छितस्थळी जावे.

24 तास प्रवेश बंद असलेले रस्ते

  •  मंगलदास रोड- ब्लू डायमंड चौक ते सर्किट हाऊस चौक
  •  रेंजहिल्स रोड- पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स कॉर्नर चौक
  •  सर मानकेजी मेहता रोड- काहूर रोड जंक्शन ते कौन्सिल हॉल चौक
  •  पुणे स्टेशन रोड- जहांगीर हॉस्पिटल चौक ते अलंकार सिनेमा चौक
  •  गणेश खिंड रस्त्यावरील चाफेकर चौक ते विद्यापीठ चौक
  •  औंध रस्त्यावरील ब्रेमन चौक ते पुणे विद्यापीठ चौक
  •  बाणेर स्त्यावरील अभिमान श्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक
  •  पाषाण रस्त्यावरील अभिमान श्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक
  •  झेडब्ल्यू हॉटेल मॅरेज चौक ते पुणे विद्यापीठ चौक

स.9 ते दु. 12, चार ते रात्री नऊपर्यंतचे बंद रस्ते

  •  लक्ष्मी रोड- संत कबीर चौक ते टिळक चौक
  •  शिवाजी रोड- स. गो. बर्वे चौक ते जेधे चौक 3) बाजीराव रोड- पुरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक
  •  केळकर रोड- टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक
  •  कुमठेकर रोड – टिळक चौक ते शनिवार चौक
  •  टिळक रोड- टिळक रोड ते जेधे चौक
  •  जंगली महाराज रोड- स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक
  •  फर्ग्युसन कॉलेज रोड खंडोजीबाबा चौक वीर चाफेकर चौक
  •  कर्वे रोड – खंडोजीबाबा चौक ते पौडफाटा 10) महात्मा गांधी रोड- पंडोल सोसायटी ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक
  •  नॉर्थ मेन रोड कोरेगाव पार्क- कोरेगाव पार्क जंक्शन ते ताडी गुत्ता

हेही वाचा

Back to top button