‘साहेब सांगतील तोच आदेश’ : शरद पवार यांच्या भेटीनंतर नीलेश लंके यांची स्पष्टोक्ती | पुढारी

'साहेब सांगतील तोच आदेश' : शरद पवार यांच्या भेटीनंतर नीलेश लंके यांची स्पष्टोक्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : नीलेश लंके यांनी काल अजित पवार गटातून बाहेर पडत आज शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीनंतर आज ज्येष्ठ नेते शरद पवार आणि निलेश लंके यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी नीलेश लंके म्हणाले की, मी साहेबांच्या विचारासोबतच आहे. साहेब सांगतील तोच माझ्यासाठी आदेश असेल असे जाहीरपणे लंके सांगितले

गेल्या अनेक दिवसांपासून लंके नाराज असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र काल भाजपच्या दुसऱ्या यादीत त्यांच्या मतदार संघातून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर लंके यांनी अजित पवार गटातून माघार घेत आज थेट शरद पवारांना भेट दिली.

यावेळी निलेश लंके यांनी बोलताना सांगितले की, यापूर्वी पुढे देखील मी शरद पवार साहेबांच्या विचारधारेनेच चालणार आहे. माझी विचारधारा आणि पक्ष एकच आहे. खासदारकी आणि इतर निवडणूकीची मी त्यांचाशी आज चर्चा केली आहे. शरद पवार यांची अदृश्य ताकद मला लाभली आहे. पवारांचं नेतृत्व मी कधीच सोडलेलं नाही. लहाणपणापासून त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास केला आहे. साहेब सांगतील तो आदेश मी पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले,  लंकेंची बांधिलकी जनतेशी आहे. मी त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. लंकेंसाठी अनेक सभा देखील घेतलेल्या आहेत. मी आज नीलेश लंकेच आज कार्यालयात स्वागत करत असल्याचे देखील पवार यावेळी म्हणाले.

Back to top button