गुंतवणुकीच्या आमिषाने वृद्धेची 60 लाखांची फसवणूक : सहा जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

गुंतवणुकीच्या आमिषाने वृद्धेची 60 लाखांची फसवणूक : सहा जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलेला तब्बल 60 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानुसार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फसवणूक, अपहार तसेच महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. द्वारका नारायण चालान (एचएच त्यांचे सदस्य सुधा द्वारका जालान, विजय जालान, संजय जालान, समीर जालान, प्रिया जालान (सर्व रा. भांडारकर रस्ता) यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रमिला ईश्वरसिंग गुप्ता (वय 71, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडील गुंतवणुकीच्या बाबत कोणताही परवाना नसताना, तक्रारदार व त्यांचे पती यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवले. त्याकरिता एकूण 60 लाख रुपये घेतली होती.

गाडी विक्रीच्या बहाण्याने गंडा

कोंढवा येथे राहणारे नसीम हमीद शेख (वय- 55) यांचा विश्वास संपादन करून आरोपी अल्ताफ सलिम सय्यद (वय- 40) याने तुमची जुनी कार विकून नवी इको गाडी घेऊन देतो, असे सांगितले. त्याकरिता त्यांच्याकडून 80 हजार रुपये ऑनलाइन घेतले. सोबत मारुती सुझुकी इस्टीलो (एमएच 14 बीसी 1916) नंबरची सिल्वर रंगाची जुनी वापरती एक लाख रुपये किंमतीची गाडी घेऊन जाऊन तक्रारदार यांना इको गाडी आणून न देता फसवणूक केली. याबाबत आरोपीवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

Back to top button