ससूनमधून आरोपी पलायन प्रकरण : दोन पोलिस कर्मचारी निलंबित | पुढारी

ससूनमधून आरोपी पलायन प्रकरण : दोन पोलिस कर्मचारी निलंबित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे. ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता तो पळून गेला. याप्रकरणी हलगर्जी केल्यामुळे सायबर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. पोलिस शिपाई निखिल अरविंद पासलकर, पोपट काळुसिंग खाडे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. मार्शल लुईस लिलाकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

धमकी दिल्याप्रकरणी स्वाती हिने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार आकुर्डी येथे राहणार्‍या मार्शल लिलाकरला अटक करण्यात आली. त्याने मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने इंस्टाग्रामवर खाते उघडून धमकी दिली होती.
दरम्यान, शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्यावर त्याला  शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा

Back to top button