Fire Accident : इमारतीला भीषण आग; सहा जणांना सुरक्षित काढले बाहेेर | पुढारी

Fire Accident : इमारतीला भीषण आग; सहा जणांना सुरक्षित काढले बाहेेर

पुणे / कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : कोंढव्यातील महंमदवाडी परिसरात दिल्ली पब्लिक स्कूलजवळ मॅजिस्टीक युरिस्का या अकरा मजली इमारतीत असलेल्या सदनिकेत मंगळवारी दुपारी आग लागली. आगीत अडकलेल्या सहा नागरिकांना बाहेर काढत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. आग लागल्यानंतर काही रहिवासी भयभीत होऊन इमारतीच्या गच्चीवर रहिवासी पळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाऊण तासात आग आटोक्यात आणली. आगीत सदनिकेतील सर्व साहित्य जळाले. कोंढव्यातील महंमदवाडी पब्लिक स्कुलजवळ मॅजिस्टीक युरिस्का बहुमजली इमारत आहे.

इमारतीत अकराव्या मजल्यावर असलेल्या  सदनिकेतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला कळविली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अकराव्या मजल्यावरील सदनिकेत लागलेली आग भडकल्याने रहिवासी भयभीत झाले. चार महिलांसह सहा रहिवासी घाबरून इमारतीच्या अकराव्या मजल्यावर गेले. घटनास्थळी पाच अग्निशमन गाड्या आणि उंच शिडीचे वाहन दाखल झाले होते. जवानांनी गच्चीवर थांबलेल्या महिलांसह रहिवाशांची सुखरुप सुटका केली. सदनिकेत कोणी अडकले नसल्याची खात्री केली.

जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही. वेळेत आग आटोक्यात आणल्याने रहिवाशांनी जवानांचे आभार मानले. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे, समीर शेख, प्रमोद सोनवणे, पंकज जगताप, राजेश जगताप, सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 30 जवानांनी आग आटोक्यात आणली.

भयभीत रहिवासी गेटबाहेर पळाले

अग्निशमन दलाचे प्रमोद सोनवणे यांना समजल्यानंतर ते तयारी निशी घटनास्थळी पोहचले. मात्र त्या ठिकाणी एवढे नागरिक अडकले नसल्याचे समजल्यानंतर नव्हती. अडकलेल्या सहा जणांना जवानांनी बाहेर काढले. त्यानंतर आग विझविण्यास सुरवात केली. एकूण अकरा गाड्या आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला लागल्या. यावेळी त्या बिल्डींगमध्ये राहणारे रहिवासी भयभीत झाले होते. त्यांनाही यावेळी दिलासा देण्यात आला. यावेळी सर्व नागरिक सदनिका सोडून गेटच्या बाहेर बसले होते.

हेही वाचा

Back to top button