आमचा निर्णय योग्य होता; निकालाचे समाधान : प्रफुल्ल पटेल | पुढारी

आमचा निर्णय योग्य होता; निकालाचे समाधान : प्रफुल्ल पटेल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता आणि निवडणूक आयोगाने आमचा निर्णय योग्य ठरवला आहे. याचे आम्हाला समाधान आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर आनंद व्यक्त केला आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकार्‍यांना मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे.

Back to top button