Pune News : ललित कला केंद्राचे डॉ. प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक | पुढारी

Pune News : ललित कला केंद्राचे डॉ. प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रामायणातील व्यक्तिरेखा असलेल्या नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. नाटकातील संवादातून भावना दुखावल्याच्या आरोपावरून ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हर्षवर्धन सुनील हरपुडे (वय 22 रा. मनोरत्न अपार्टमेंट, अरण्येश्वर) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. प्रवीण दत्तात्रय भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषीकेश दळवी, यश चिखले यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.2) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललीत कला केंद्रात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे रामायणातील व्यक्तिरेखा असलेले नाटक शुक्रवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी बंद पाडले. पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद होते, तसेच भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. याबाबत अभाविपकडून तक्रार देण्यात आली. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी रामायणातील व्यक्तिरेखांवर नाटक सादर केले.

या नाटकात भावना दुखावणारे संवाद असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून विभाग प्रमुख डॉ. भोळे यांच्यासह सहा जणांना अटक केली, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. भोळे विभाग प्रमुख आहेत. नाटक सादर करण्यापूर्वी किमान त्यांनी संहिता वाचायला हवी होती. भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याचे मगर यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा

 

 

Back to top button