दिल्लीसह उत्तरेकडे जाणारी सहा विमाने रद्द; खराब हवामानाचा फटका | पुढारी

दिल्लीसह उत्तरेकडे जाणारी सहा विमाने रद्द; खराब हवामानाचा फटका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातून दिल्लीसह उत्तर भागातील राजकोट, प्रयागराज, अहमदाबाद ही विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. तर दक्षिणेकडील चेन्नईसाठी होणारे एक विमान रद्द झाली आहेत, अशी मिळून एकूण सहा विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. खराब हवामानामुळे सातत्याने विमान उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांची चांगलीच कसरत होत आहे. उत्तर भागातील हवामान दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे पुण्यातून दिल्लीकडे होणारी विमान उड्डाणे सातत्याने रद्द केली जात आहे. परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी (दि.14) रोजी देखील अशीच स्थिती निर्माण झाली. परिणामी, 6 विमान उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे सुमारे सहाशेच्या घरात प्रवाशांचा नियोजित प्रवास शुक्रवारी थांबला. त्यांची नियोजित कामे होऊ शकली नाहीत. परिणामी विमान प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विमाने होताहेत सातत्याने रद्द..

मागील तीन आठवड्यापुर्वी खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, लखनऊ, हैदराबाद, अमृतसर, गोवा याठिकाणांसाठी होणारी नऊ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तत्पुर्वी मिचाँग वादळामुळे 14 विमाने रद्द झाली होती. त्यानंतर पुन्हा आठ विमाने रद्द झाली. आणि आता पुन्हा 6 विमाने रद्द झाली आहेत. यामुळे प्रवाशांचे गेल्या डिसेंबर आणि आताच्या जानेवारी महिन्यात विमान प्रवासासाठी प्रचंड हाल झाले आहेत.

खराब हवामानामुळे सहा विमाने रद्द झाली आहेत. त्यापार्श्वभुमीवर संबंधित विमान कंपन्यांकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, पुणे विमानतळ प्रशासन आणि सीआयएसएफकडून सुध्दा प्रवाशांच्या सोयीसाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

हेही वाचा

Back to top button