Cyclone Remal Latets Updates: ‘रेमल’ चक्रीवादळ आज मध्यरात्री किनारपट्टीला धडकणार | पुढारी

Cyclone Remal Latets Updates: 'रेमल' चक्रीवादळ आज मध्यरात्री किनारपट्टीला धडकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क: चक्रीवादळ ‘रेमल’ पुढील काही तासांत आणखी रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. दरम्यान आज (दि.२६) मध्यरात्री ‘रेमल’ चक्रीवादळ (Cyclone Remal Latets Updates) पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. दरम्यान. बंगालसह अनेक राज्यांना याचा फटका बसेल, अशी   शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदाच्या हंगामातील हे पहिलेच चक्रिवादळ असून, या वादळाला ‘रेमल’ (Cyclone Remal) असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाला ओमानने ‘रेमल’ असे नाव दिले असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

वादळादरम्यान ताशी 135 किमीचा वारा वेग गाठू शकतो

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ताशी 110-120 किलोमीटर वेगाने जमिनीवर धडकू शकते. ते ताशी 135 किलोमीटरचा वेग गाठू शकते. वादळाच्या (Cyclone Remal Latets Updates) आगमनाच्या वेळी समुद्रात 1.5 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि बांगला देशातील सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

२७ मे आणि २८ मे रोजी अतिवृष्टीचा इशारा

‘रेमल’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांसाठी (दक्षिण आणि उत्तर 24 परगणा) रेड अलर्ट (Cyclone Remal Latets Updates) जारी केला आहे. रविवार २६ मे आणि सोमवारी २७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये सोमवार (दि.२७ मे), मंगळवारी (दि.२८ मे) अतिवृष्टी होऊ शकते, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

NDRF टीम तैनात, लष्कर आणि नौदल अलर्ट मोडवर

मच्छिमारांना सोमवार (दि.२७) सकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्या भागात वादळाचा प्रभाव जास्त दिसू शकतो तेथे खबरदारीचा उपाय म्हणून NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तर लष्कर आणि नौदलाला देखील अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

कोलकाता विमानतळ २१ तासांसाठी बंद राहणार

चक्रीवादळ ‘रेमल’चा प्रभाव लक्षात घेता, कोलकाता विमानतळावरील विमान वाहतूक रविवारी दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 21 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी स्केटधारकांसोबत झालेल्या बैठकीनंतर ऑपरेशन स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

‘या’ भागावर परिणाम, महाराष्ट्रावर कोणताही परिणाम नाही

IMD बुलेटिन नुसार, चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीचे जिल्हे प्रभावित होतील. रविवार २६ मे आणि सोमवार २७ मे रोजी ‘या’ राज्यातील भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे, बहुतेक भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. तर महाराष्ट्रातील कोणत्याही भागात काहीच परिणाम होणार नाही; असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button