अंगणवाडी सेविकांचे जेल भरो आंदोलन | पुढारी

अंगणवाडी सेविकांचे जेल भरो आंदोलन

भोर : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका कृती समितीच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांनी भोर पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने करत जेल भरो आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी, सरकारी कर्मचारी दर्जा, 26 हजार रुपये किमान वेतन द्या, अर्ध्या पगाराएवढी पेन्शन द्या, नवीन मोबाईल द्या आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी भोर तालुका पंचायत समितीच्या कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन केले.

त्याचबरोबर नवीन अंगणवाडी सेविकांना कमी करण्याबाबत दिलेल्या नोटिसांची होळी केली. मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत रोजचे आंदोलन सुरू ठेवू, असे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक सचिव विठ्ठल करंजे यांनी सांगितले. या वेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते बापू कुडले, मोनिका घोडके, राणी शिंदे, महेंद्र सोनवणे यांनी पाठींबा दिला. गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भोर तालुकाध्यक्ष महानंदा जेधे, सुनिता ढिले, सुलभा जोशी, किर्ती शिर्के, वैशाली राऊत, मीना शिवतरे, संगीता खंडाळे, सुजाता वीर, संध्या झगडे, अलका शेडगे, उज्ज्वला चौधरी आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

हेही वाचा 

Back to top button