Raosaheb Wagh : शेकापचे ज्येष्ठ नेते रावसाहेब वाघ यांचे निधन

Raosaheb Wagh : शेकापचे ज्येष्ठ नेते रावसाहेब वाघ यांचे निधन

सेलु, पुढारी वृत्तसेवा: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा बाजार समितीचे माजी सभापती ज्येष्ठ विधिज्ञ रावसाहेब शंकरराव वाघ (वय ८२) यांचे दीर्घ आजाराने आज (दि.१३) निधन झाले. सेलू येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी सेलु येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Raosaheb Wagh

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून रावसाहेब वाघ यांनी जिल्ह्य़ातील शेतकरी, शेतमजूर, विविध समाज घटकांसाठी काम केले होते. १९८७ ते ९८ या कालावधीत त्यांनी बाजार समितीचे सभापती म्हणूनही काम पाहिले. तसेच १९७३ ते ७८ या दरम्यान परभणी जिल्हा परिषदचे ते सदस्य होते. तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. Raosaheb Wagh

सेलू तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवला होता. तसेच सेलू तालुका निर्मितीत वाघ यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. १९९० साली शेकापच्या तिकीटावर त्यांनी पाथरी विधानसभेची निवडणूक लढवली होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांचे वडील तर स्ञीरोग तज्ज्ञ डॉ. शरद वाघ यांचे ते चुलते होत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news