खंडणी दे अन्यथा, न्यूड व्हिडिओ व्हायरल करू; परिचारिकेला चोरट्याची धमकी | पुढारी

खंडणी दे अन्यथा, न्यूड व्हिडिओ व्हायरल करू; परिचारिकेला चोरट्याची धमकी

पुणेः पुढारी वृत्तसेवा : समाजमाध्यमांवर सापळा लावून सायबर चोरट्यांनी एका पारिचारिकेला न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 40 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 33 वर्षीय पारिचारिकेने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 31 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 या कालावधीत घडली आहे.

फिर्यादी ह्या एका रुग्णालयात पारिचारिका म्हणून काम करतात. त्या आपल्या पतीपासून विभक्त राहतात. समाज माध्यमातून अमनप्रित सिंग नावाच्या व्यक्तीसोबत त्यांचा परिचय झाला होता. त्याने आपण लंडन येथे राहत असून, भारतात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात खेचले. पुढे विदेशातून महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगून त्याचे पार्सल घेण्यासाठी 27 हजार रुपये उकळले. फिर्यादीचा व्हिडीओ कॉलद्वारे न्यूड व्हिडीओ तयार करून तो, व्हायरल करण्याच्या धमकीने चाळीस हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

Back to top button