‘दारू नको, दूध प्या’ ; व्यसनमुक्ती केंद्राचा नववर्ष पूर्वसंध्येला उपक्रम | पुढारी

‘दारू नको, दूध प्या’ ; व्यसनमुक्ती केंद्राचा नववर्ष पूर्वसंध्येला उपक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘दारू नको दूध प्या’, ‘मानवतेचा बोध घ्या बाटली फोडा, दूध जोडा…’, ‘दारूचा पाश जीवनाचा नाश’, ‘दारू सोडा आनंद जोडा’ अशा घोषणा देत नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व महाविद्यालयीन तरुणाईने जनजागृती केली. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे. नववर्षाचे स्वागत दारू न पिता दूध पिऊन करावे, असा संदेश देत दूधवाटप करण्यात आले.

डेक्कनजवळील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल, केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, कात्रज डेअरीचे कुमार मारणे, धनजंय वाडकर, अनुपकुमार कुंडेटकर, ऋषिकेश इंगळे, अविनाश गेंगजे, संतोष पटवर्धन, कृष्णा भताने, विशाल शिंदे, दत्तात्रय सोनार, संतोष पटवर्धन, आपलं फाउंडेशनचे मनीष भोसले यांसह मान्यवर उपस्थित होते. डॉ. अजय दुधाणे म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत तरुणाई दारूचे सेवन करून करते. यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधीनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी यासाठी दुधाचे वाटप करून ‘दारू नको, दूध प्या’ हा उपक्रम राबविला जातो.

हे ही वाचा :

Back to top button