मागोवा 2023 : सर्वांत कमी पाऊस, थंडी अन् विक्रमी प्रदूषण | पुढारी

मागोवा 2023 : सर्वांत कमी पाऊस, थंडी अन् विक्रमी प्रदूषण

आशिष देशमुख

पुणेकरांनी आजवर इतका कमी पाऊस, कमी थंडी अन् वायुप्रदूषण पाहिले नव्हते, ते सर्व 2023 या वर्षाने दाखवले. शहरात मान्सून 40 ते 60 टक्क्यांनी कमी बरसला. डिसेंबरमध्ये शहराचे तापमान एकदाही 8 अंशांखाली गेले नाही. दिवाळीत वायुप्रदूषणाने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत दिल्लीपाठोपाठ दुसरा नंबर लावला. त्यामुळे सरते वर्ष पुणेकरांसाठी सर्दी, खोकला अन् तापाशी सामना करण्यातच गेले.

पुणे शहरात जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या चार महिन्यांत सरासरी 650 ते 700 मी. मी. पाऊस पडतोच. मात्र, यंदा तो 435 मी. मी. च्या वर गेला नाही, असे प्रथमच झाले. 1972 मध्येही इतका कमी पाऊस पुणे शहरात झाला नाही. मात्र, मागची तीनही वर्षे चांगला पाऊस झाल्याने धरणातील परिस्थिती बरी होती. मात्र, अल निनोचा धोका ओळखून महापालिका प्रशासनाने पाणी कपातही प्रथमच केली होती. धरणात पाणी असूनही पाणी कपात का अशी ओरड सुरू झाल्याने ती प्रशासनाने मागे घेतली.

पावसाने पाठ दाखवली-

यंदा शहरात जूनमध्ये खूप कमी पाऊस झाला. एक तर मान्सून शहरात खूप उशिरा म्हणजे 25 जून रोजी दाखल झाला. त्यामुळे अवघ्या चार- पाच दिवसांत या महिन्यात 24 ते 28 मी. मी. पावसाची नोंद झाली. दरवर्षी शहरात जूनमध्ये 130 ते 150 मी. मी. पाऊस होतोच. जूनमध्ये उणे 70 टक्के, जुलै ते सप्टेंबर उणे 40 टक्के पाऊस झाला. त्यामुळे शहराची सरासरी 40 ते 60 टक्क्यांनी घटली. त्याचा फटका पाणी कपातीच्या स्वरूपाने पुणेकरांना बसला.

हिवाळ्यात थंडी गायब..

दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस शहरात थंडीची चाहूल लागते, तर डिसेंबरमध्ये किमान तापमान 6 ते 8 अंशांवर खाली जाते. मात्र, यंदा दिवाळी संपली तरीही शहरात थंडी कमी पडली नाही. नोव्हेंबर उष्णच गेला, तर डिसेंबर महिन्यात बाष्पयुक्त वार्‍यांनी 8पान 4 वर

आबालवृध्दांसाठी ठरले आजाराचे वर्ष

शहरात सतत विचित्र हवामान नागरिकांनी वर्षभर अनुभवले. त्याचा फटका आबालवृध्दांच्या आरोग्यावर झाला. सतत सर्दी, खोकला आणि तापेने पुणेकर हैराण राहिले. दिवाळीत तर दवाखाने सतत गर्दीने भरलेले दिसत होते. डॉक्टरांच्या मते खराब हवामानाचा फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त बसला. त्यांना श्वसनाच्या विविध विकारांनी ग्रासले होते.

बांधकामासाठी बदलावी लागली नियमावली

शहरात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून विकासकामे जारदार सुरू आहेत. यात मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. मात्र शहरातील वाढत्या बांधकामांचा फटका हवा प्रदूषणाला बसतोय असा अहवाल येताच महापालिकेला बांधकाम साईटवरील नियमावली बदलावी लागली. अनेक बांधकाम आस्थापनांना नोटिसा बजावून नवी एसओपी जाहीर केली. दिवाळीत सुरू झालेले हवा प्रदूषण अखेर महिनाभराने कमी झाले. पण, शिवाजीनगर अन् स्वारगेटची हवा मात्र सर्वाधिक प्रदुषित गटात आहेच.

हेही वाचा

 

Back to top button