Weather Update : अवकाळी थांबला; आता थंडी वाढणार | पुढारी

Weather Update : अवकाळी थांबला; आता थंडी वाढणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र, कोकणसह मध्य मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. आता मात्र आकाश निरभ्र झाले असून, पाऊस पूर्णपणे थांबला. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत थंडीत काहीशी वाढ होऊन किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, शनिवारपासून पाऊस पूर्णपणे थांबला असून, हवामान कोरडे राहिले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात घट होऊन काहीशा प्रमाणात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

पाऊस ओसरताच किमान तापमानात शनिवारी एक ते दीड अंशांनी घसरण झाली असून, शनिवारी राज्यात बीड येथे सर्वात कमी म्हणजेच १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा

 

 

Back to top button