कोयना एक्स्प्रेस दोन तास पडली बंद; प्रवाशांचे हाल | पुढारी

कोयना एक्स्प्रेस दोन तास पडली बंद; प्रवाशांचे हाल

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने जाणार्‍या कोयना एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही रेल्वे सातारा जिल्ह्यातील तारगाव स्टेशनमध्ये बंद पडली. तब्बल 2 तास रेल्वे बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सध्या बसस्थानक व रेल्वेस्थानके गर्दीने फुल्ल झाली आहेत. दिवाळीमुळे चाकरमानी सातार्‍यासह, सांगली व कोल्हापूरच्या दिशेला निघाले आहेत. मुंबईहून कोल्हापूरकडे जाण्यासाठी कोयना एक्स्प्रेस ही सकाळी 8 वाजता मुंबईतून मार्गस्थ झाली होती. वेळेआधीच ही रेल्वे सातारा स्टेशन क्रॉस करून तारगाव स्टेशनवर आली असता रेल्वेचे इंजिन बंद पडले. शनिवारी सायं. 5 वा. हा प्रकार घडला. अखेर किर्लोस्करवाडीतून दुसरे इंजिन एक्स्प्रेसला जोडल्यानंतर ही गाडी कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली.

Back to top button