Pune News : प्रदूषण नियंत्रणासाठी टास्क फोर्स | पुढारी

Pune News : प्रदूषण नियंत्रणासाठी टास्क फोर्स

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोना साथीच्या काळात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. या टास्क फोर्सकडून कोरोना महामारी रोखण्याच्या दृष्टीने विविध सूचना देण्यात येत होत्या. याच धर्तीवर आता वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली.

मुंबई व पुण्यात वायुप्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. वायू गुणवत्ता निर्देशांक 200 हून पुढे गेला आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजनांची गरज असल्याचे टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. टास्क फोर्समध्ये बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील फुप्फुस रोग विभागाचे प्रमुख, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभाग व पर्यावरण विभागाचे तज्ज्ञ, साथरोग विभागातील अधिकारी यांचा समावेश असणार आहे.

प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठल्याने उपाययोजना करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने आणि आरोग्याची काळजी घेण्याचा दृष्टीने टास्क फोर्स मार्गदर्शन करणार आहे.

– डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, साथरोग विभाग, पुणे

हेही वाचा

Back to top button