Shiv Mahapuran : नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण कथा | पुढारी

Shiv Mahapuran : नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण कथा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक येथे दि. २१ ते २५ नाेव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय महाशिवपुराण (Shiv Mahapuran) कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या अध्यक्षपदी पालकमंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली

शासकीय विश्रामगृह येथे सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात पार पडलेल्या बैठकीप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांसह नाशिक व त्र्यंबकेश्वरचे साधू-महंत उपस्थित होते. बैठकीत प्रसिद्ध शिवमहापुराण कथा विमोचनकार पंडित प्रदीप मिश्रा यांचा प्रवचन सोहळ्यास सुमारे पाच ते सहा लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा सोहळा पूर्ण श्रद्धेने, सुव्यवस्था राखून यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. (Shiv Mahapuran)

भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेत कथेसाठी जागा, भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्री शिवमहापुराण कथा आयोजन समिती स्थापन करण्यात येणार आहे. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे दोन दिवसांमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी बोलून समित्या निश्चित करतील. तसेच कामांची जबाबदारी वाटून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. (Shiv Mahapuran Nashik)

याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बनकर, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, उद्योजक जितुभाई ठक्कर, निमाचे धनंजय बेळे, श्याम साबळे, सुदाम ढेमसे, प्रकाश लोंढे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

युवकांनी संपर्क साधावा

शिवमहापुराण कथेत ज्या महाविद्यालयीन युवक-युवतींना स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे, त्यांनी आपले नाव, नंबर, कॉलेजचे नाव व अन्य माहिती देण्यासंदर्भात संबंधितांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button