Pimpri News : एकच मिशन मराठा आरक्षण’ | पुढारी

Pimpri News : एकच मिशन मराठा आरक्षण’

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी, चिंचवडगाव आणि पिंपळे सौदागर येथील सकल मराठा समाजबांधवांनी बुधवारी (दि. 1) एकदिवसीय उपोषण केले.
पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे एकदिवसीय साखळी उपोषण आंदोलन झाले. समस्त पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

माजी नगरसेवक संदीप वाघेरे, संजोग वाघेरे, प्रभाकर वाघेरे, दत्ता वाघेरे तसेच अखिल पिंपरी शिवजयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते, गोरक्षक आदी उपस्थित होते. पिंपळे सौदागर येथील पी.के.चौकात एकदिवसीय उपोषण करण्यात आले. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे उपोषण झाले. माजी नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे यांच्यासह ग्रामस्थ, तरुण मंडळी, सोसायट्यांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. समस्त पिंपळे सौदागर ग्रामस्थांनी आंदोलनाचे नियोजन केले.

निगडीत देशमुख यांची प्रकृती खालावली

निगडी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली देशमुख यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या समवेत नवीन भालेकर हे देखील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस सुरु होता. माऊली देशमुख यांना ओआरएस चालू केले आहे. तसेच, त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली.

  • चिंचवडगाव येथील चापेकर चौकात चिंचवडगाव ग्रामस्थांच्या वतीने उपोषण आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये माजी नगरसेवक अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे, मारुती भापकर यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
  • चिंचवडगाव येथील चापेकर चौकात चिंचवडगाव ग्रामस्थांच्या वतीने उपोषण आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये माजी नगरसेवक अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे, मारुती भापकर यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

हेही वाचा 

तब्बल एक लाख वर्षांपूर्वीच्या मॅमथचा दात

कृत्रिम प्रकाशाचा होत आहे विपरीत परिणाम

अंगावर कॉफी सांडल्याने द्यावी लागली मोठी भरपाई

Back to top button