Sassoon drug case : मोठी बातमी! ससून ड्रग प्रकरणाचा अहवाल शासनाला सादर | पुढारी

Sassoon drug case : मोठी बातमी! ससून ड्रग प्रकरणाचा अहवाल शासनाला सादर

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मधील चौकशी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल आजच राज्य शासनाला सादर केला आहे.  ड्रग तस्कर ललित पाटील याच्यासह इतर नऊ कैद्यांवर ससूनमध्ये अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. दरम्यान, ललित पाटील पसार झाला. त्यानंतर ससूनच्या कारभाराचे वाभाडे निघाले. त्यात ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना कैद्यांचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्तांनी मागवला होता.

अहवाल पाठवण्यास डॉ. ठाकूर यांनी नकार दिल्याने राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनायचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या समितीने रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 16 मध्ये जाऊन 80 जणांचे जबाब नोंदवून घेतले. चौकशी अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. मात्र, अहवालात काय आहे, याची माहिती गोपनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Pimpri News : औद्योगिक सांडपाण्याची माहिती उद्योगांकडून मिळेना

Krishna river : अखेर कोयनेतून कृष्णा नदीत पाणी सोडले

Krishna river : अखेर कोयनेतून कृष्णा नदीत पाणी सोडले

Back to top button