Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई ‘द्रुतगती’वर आज १ तासाचा ब्लॉक; या वेळेत राहणार बंद? | पुढारी

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई 'द्रुतगती'वर आज १ तासाचा ब्लॉक; या वेळेत राहणार बंद?

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे-मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत ग्रँटी बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम एक्स्प्रेस वे वरील मुंबई वाहिनीवर किलोमीटर 39/900 ढेकू गाव, किलोमीटर41/500 आडोशी आणि किलोमीटर 45/600 अमृतांजन पूल येथे चालणार आहे. त्याकरिता गुरुवारी (दि. 12) रोजी दुपारी 12.00 ते 1.00 रोजी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा

खरिपातील धान्योत्पादन 41 लाख टनांनी घटणार

Mohata Devi : आणि म्हणून या गावात मोहटा देवीच्या आशिर्वादाने दूध, तूप विकलं जात नाही

Pune News : पारितोषिकाची वाढीव रक्कम मान्यतेच्या ‘कचाट्यात’

Back to top button