

यंदाच्या खरीप हंगामात पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यानंतर पावसात खंड पडला. त्याचा परिणाम होऊन मूग, उडदाचा पेराच घटल्याने उत्पादनात घट येणार, हे स्पष्टच होते. सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा चांगली हजेरी लावल्यामुळे काही पिकांच्या उत्पादनाची स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. तर, काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसानही झाल्याचे समोर आले आहे.– दिलीप झेंडे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण),कृषी आयुक्तालय, पुणे