Pune News : भांडणे सोडविण्यास आलेल्या तरुणावर वार | पुढारी

Pune News : भांडणे सोडविण्यास आलेल्या तरुणावर वार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘माझ्याबद्दल चाहाड्या करतोस, तुझ्यामुळे माझी नोकरी गेली. आता तुझा विषय कायमचा संपवून टाकतो’, असे म्हणून एकाने कोयत्याने तरुणाच्या डोक्यात वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. रणजित रिठे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी, विनय शरद खवळे (वय 24, रा. सिंहगड कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज अंकुश धोत्रे (वय 28, रा. सिंहगड कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरासमोर दुचाकीवर बसले असताना त्यांच्या घरासमोर राहणारा आरोपी पंकज याने अचानक फिर्यादीस शिवीगाळ करून त्याच्या तोंडावर ठोसा मारून खाली पाडले. ते पाहून फिर्यादीचा मामेभाऊ रणजित रिठे हा मध्ये आला. त्याने त्यालाही ठोसा मारला. घरातून लोखंडी शस्त्र घेऊन येऊन रणजित याला ‘तू माझ्याबद्दल चाहाड्या करतोस.

तुझ्यामुळे माझी नोकरी गेली व माझ्याकडे सारखा रागाने बघतोस, तुला मी जिवंत सोडणार नाही. तुझा विषय कायमचा संपवून टाकतो,’ असे बोलून त्याने रणजित याच्या तोंडावर, डाव्या बाजूला, डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.

हेही वाचा

पुणेकरांनो सावधान! शहरात भेसळयुक्त तूपविक्री जोमात; 700 किलो तूप जप्त

Nashik Leopard : त्र्यंबकेश्वर शहरात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

Nanded Hospital News : असुविधा, गैरव्यवस्थापनामुळे बालकांचे मृत्यू!

Back to top button