Nashik Leopard : त्र्यंबकेश्वर शहरात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद | पुढारी

Nashik Leopard : त्र्यंबकेश्वर शहरात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

ञ्यंबकेश्वर : शहरातील वारुंगसे मळा येथे वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.3) पहाटे बिबट्या जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांपासून ञ्यंबकेश्वर येथे बिबट्याचा वावर वाढल्याने दहशत पसरली होती. सकाळी व सायंकाळी फेरफटका मारायला जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. (Nashik Leopard)

मागील पंधरवड्यात शासकीय विश्रामगृहासमोरील पेट्रोलपंपाच्या बाजूला बिबट्याने कुञ्यावर हल्ला केला होता. आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले. जवळच असलेल्या उसाच्या फडात बिबट्या गायब झाला. तेव्हापासून परिसरात भीतीचे वातावरण होते. वारुंगसे मळा परिसरात लोकवस्ती वाढली आहे. नाशिक-ञ्यंबक रस्त्यापासून मळ्याजवळ आहे. शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक यांसह नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत होते. बिबट्याचे अनेकांना दर्शन झाले होते. वनखात्याने येथे पिंजरा ठेवला होता. त्यामध्ये मंगळवारी बिबट्या अडकला. तथापि नागरिकांनी आणखी एक अथवा दोन बिबटे असल्याचा संशय व्यक्त केला. वनखात्याने आणखी एक पिंजरा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  (Nashik Leopard)

हेही वाचा : 

Back to top button