Pune Mhada News : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ | पुढारी

Pune Mhada News : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या 5 हजार 863 सदनिकांसाठी आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी आता 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध नवीन वेळापत्रकानुसार पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात 9 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य योजनेंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आजपर्यंत सुमारे 32 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अधिवास प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत मिळण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार व नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी पुणे मंडळाने सोडतीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

बदललेल्या तारखा

नवीन वेळापत्रकानुसार दि. 20 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. दि. 21 ऑक्टोबर, 2023 रोजी रात्री 11.59 पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. दि. 21 ऑक्टोबर, 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत ठढॠड / छएऋढ द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दि. 27 ऑक्टोबर, 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 03 नोव्हेंबर, 2023 रोजी सायंकाळी सात वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

अशा आहेत सदनिका

पुणे जिल्हा – 5425

सोलापूर – 69

सांगली – 32

कोल्हापूर – 337

हेही वाचा

इंटरेस्ट दाखवा; पालकमंत्रिपद सोडतो : पालकमंत्री केसरकर

Pune News : पुणे ग्रामीण पोलिसांकडून तगडा बंदोबस्त

Pune News : तीन वर्षांत रेबीजच्या 52 रुग्णांवर उपचार

 

Back to top button