Mission Admission : एआय, ई अ‍ॅण्ड टीसी, सीएसचा बोलबाला | पुढारी

Mission Admission : एआय, ई अ‍ॅण्ड टीसी, सीएसचा बोलबाला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या अभियांत्रिकी पदवी प्रवेशात यंदा सिव्हील,ई अ‍ॅण्ड टिसी, सीएस, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तर सिव्हील, मॅकेनिकल, इलेक्ट्रीकलसह अन्य काही शाखांची बाके मात्र रिकामीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात यंदा व्यवसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यातच अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. अभियांत्रिकीच्या देखील ठराविक शाखांच्या उपलब्ध जागांपैकी जवळपास 80 ते 90 टक्के प्रवेश झाले आहेत.

अभियांत्रिकीच्या 1 लाख 58 हजार 585 जागांपैकी 1 लाख 17 हजार 585 जागांवर विद्यार्थ्यांनी विविध शाखांना प्रवेश घेतला आहे. तर 41 हजार जागा अजूनही रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये आर्टीफिशीयल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड डाटा सायन्सच्या 7 हजार 466 जागांपैकी 6 हजार 781 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर केवळ 685 जागा रिक्त राहिल्या आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 25 हजार 887 जागांपैकी 23 हजार 62 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

कॉम्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंगच्या 13 हजार 793 जागांपैकी 12 हजार 353 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलाजीच्या 12 हजार 359 जागांपैकी 11 हजार 565 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ई अ‍ॅण्ड टिसीच्या 18 हजार 806 जागांपैकी 15 हजार 229 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल, सिव्हिल इंजिनिअरिगंच्या जागा मात्र 40 ते 50 टक्के इतक्या रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थी आता संगणकाआधारित अभ्यासक्रमांनाच पसंती देत असल्याचे चित्र सिईटीसेल ने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :

Tamilnadu : तामिळनाडुच्या निलगिरी जिल्ह्यात दोन वाघिणींचा संशयास्पद मृत्यू

पावसाची बातमी ! राज्यात दोन दिवस हलका पाऊस

Back to top button