पावसाची बातमी ! राज्यात दोन दिवस हलका पाऊस | पुढारी

पावसाची बातमी ! राज्यात दोन दिवस हलका पाऊस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोकण वगळता उर्वरित राज्यातून मोठा पाऊस ओसरला आहे. आगामी दोन दिवस राज्यातील काही भागात हलका पाऊस होईल.13 सप्टेंबर नंतर पुन्हा राज्यात पावसाच्या आगमानाचे संकेत असून विदर्भात जास्त जोर राहणार आहे. रविवार पासून राज्यातील बहुतांश भागातील पाऊस कमी झाला आहे. फक्त कोकणात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. मध्यमहाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस सुरू आहे.

आगामी दोन दिवस अत्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. 12 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात नवी चक्रीय स्थिती तयार होत आहे त्यामुळे 13 पासून राज्यात पुन्हा पाऊस सुरू होण्याचे संकेत आहेत.मात्र 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान कोकण व विदर्भात पावसाचा जोर राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हे ही वाचा :

इटलीची प्रकल्पातून माघार; चीनला झटका

पालकमंत्रिपदांचे लवकरच वाटप : खा. सुनील तटकरे

Back to top button