पिंपरी : पालिकेच्या त्या चार पदांचा निकाल अखेर जाहीर | पुढारी

पिंपरी : पालिकेच्या त्या चार पदांचा निकाल अखेर जाहीर

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील ब आणि क गटातील जागांसाठी सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षांतील लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि कनिष्ठ अभियंता विद्युत या चार पदांचा निकाल अखेर, बुधवारी (दि.30) जाहीर करण्यात आला. त्यामुळे परीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. महापालिका नोकरभरती परीक्षेचा निकाल कधी? निकाल तीन महिन्यांपासून प्रलंबितफ या शीर्षकाखाली मपुढारीफने बुधवार (दि. 29) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची तातडीने दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने आज सायंकाळी उशीरा त्या चार पदांचा निकाल जाहीर केला.

महापालिकेच्या विविध 15 पदांसाठी 387 जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. राज्यातील विविध केंद्रांवर मे महिन्यात परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी 85 हजार 387 जणांनी अर्ज केले होते. मात्र, प्रत्यक्षात 55 हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी उत्तरसूची जाहीर करण्यात आली. त्यापैकी 11 पदांसाठी 35 जांगाचा निकाल 7 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आला.

लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या उर्वरित 4 पदांचा परीक्षेला तब्बल 47 हजार 553 अर्ज आले होते. त्यापैकी 30 हजार 581 अर्जदारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर, 16 हजार 972 अर्जदार गैरहजर राहिले. तीन महिले झाले तरी, निकाल जाहीर होत नसल्यामुळे परीक्षार्थी हवालदिल झाले आहेत. अखेर, महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आज सायंकाळी उशीरा निकाल जाहीर केला.

परीक्षेला बसलेले उमेदवार
पदनाम                      पदसंख्या      हजर      गैरहजर
लिपिक                        213        22,045    11,854
स्थापत्य अभियांत्रिकी      74          8,305       3,959
सहायक
कनिष्ठ अभियंता           48         19,590     11,317
स्थापत्य
कनिष्ठ अभियंता विद्युत18         2,686     1,696

एकूण                    353         30,581  16,972

कागदपत्रांची तपासणी करणार
निकालानंतर आता 4 ते 5 दिवसांनी आरक्षणासह यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. निवड समितीच्या बैठकीत अंतिम यादी तयार केली जाईल. अंतिम यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर पोलिस व्हेरीफेकेशन तसेच, आरोग्य तपासणी होऊन पात्र उमेदवारांना निवडीचे पत्र दिले जाईल. हे करताना परीक्षेच्या ठिकाणी घेतलेली डोळ्याची प्रतिमा आणि आताच्या डोळ्याची प्रतिमा एकच असल्याची तपासणी केली जाणार आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा

निगडी पीएमपी आगार मालामाल; रक्षाबंधननिमित्त दहा लाखांचे उत्पन्न

Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली, खरीप हंगाम हातातून जाण्याच्या भिती

काँग्रेसची जनसंपर्क यात्रा चार सप्टेंबरला नाशकात

Back to top button