निगडी पीएमपी आगार मालामाल; रक्षाबंधननिमित्त दहा लाखांचे उत्पन्न | पुढारी

निगडी पीएमपी आगार मालामाल; रक्षाबंधननिमित्त दहा लाखांचे उत्पन्न

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रक्षाबंधन सनानिमित्त भावाला राखी बांधण्यासाठी जाणार्‍या बहिणींच्या मदतीला पीएमपीने जादा गाड्यांची सुविधा करण्यात आली होती. यामध्ये निगडी डेपोमधून सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमुळे पहिल्याच पाळीत 10 लाखांचे उत्पन्न डेपोला मिळाले आहे.

प्रशासनाच्या वतीने दरवर्षी ज्यादा गाड्यांची सोय करण्यात येते. त्यानुसार पीएमपीच्या वतीने दोन कोटी 50 लाख रुपये उत्पनाचे लक्ष्य ठेवण्यात आले. त्यामध्ये निगडी आगाराला 24 लाख 27 हजारांचे लक्ष्य देण्यात आले. बसचे उत्पन्न दोन पाळीत जमा केले जाते. पहिल्या पाळीत 10 लाख 32 हजार 108 रुपये जमा झाले. तर दुसर्‍या पाळीच्या उत्पन्नाची माहिती रात्री उशिरा दिली जाते.

दहा ज्यादा बस :

निगडी आगारामधून एकूण दहा जादा बस सोडण्यात आल्या होत्या. दोन पाळीत एकण 258 बस रस्त्यावर धावल्या. पहिल्या पाळीत 49 हजार 646 प्रवाशांनी प्रवास केला. यांमधून 10 लाख 32 हजार 108 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

पासधारकांचा उत्तम प्रतिसाद :

रक्षाबंधन सणाला पास धारकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. पहिल्या पाळीतील उत्पन्नात 58 हजार 650 रुपयांचा सहभाग होता. एका दिवसातील पास तसेच मासिक आणि इतर पासधारकांनी प्रवास केल्याची माहिती प्रशाकांनी दिली.

तिकीट विक्रीद्वारे अधिक रोकड :

पासधारकांपेक्षा तिकीटांच्या विक्रीमधून डेपोला अधिक उत्पन्न मिळाले. यामधून एकूण नऊ लाख 73 हजार 458 रुपयांचे रोख उत्पन्न मिळाले आहे.

मेट्रो, खासगी वाहनांचा परिणाम

शहरात मेट्रो सेवा सुरु होण्यापूर्वी 52 हजारांहून अधिक प्रवाशी प्रवास करीत होते. मात्र यावेळी तीन ते चार हजारांनी प्रवाशी संख्या घटली असून, केवळ 49 हजार 646 प्रवाशांनी प्रवास केला.

हेही वाचा

टाकळीभान : पाण्यावरुन महिलांनी गाजवली ग्रामसभा

काँग्रेसची जनसंपर्क यात्रा चार सप्टेंबरला नाशकात

नांदेडकरांच्या घशाला कोरड ; नागरिक पाणीटंचाईने हैराण

Back to top button