Pune Water : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा बंद | पुढारी

Pune Water : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणे : पर्वती उपकेंद्रात विद्युतविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि. 31) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पर्वती, लष्कर, वडगाव जलकेंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, वारजे, चांदणी चौक टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी, एसएनडीटी परिसर, कोंढवे धावडे जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र व त्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील पाणी बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

हेही वाचा

तेलगी घोटाळ्याच्या आरोपपत्रातील नावे खोडणारा अद़ृश्य हात कोणाचा?

सातारा : गतवर्षी धरणे 94 टक्के, यंदा 80 टक्क्यांवरच

चंद्रपूर : अन्यथा मंत्रालयात विष प्राशन करू; अंबुजा सिमेंट प्रकल्पग्रस्तांचा इशारा

Back to top button