पिंपरी : पत्रकारिता सर्वसमावेशक, व्यापक, निर्भिड हवी | पुढारी

पिंपरी : पत्रकारिता सर्वसमावेशक, व्यापक, निर्भिड हवी

पिंपरी : पत्रकारिता ही व्यापक, सर्वसमावेशक व निर्भिड असावी. तसेच, पत्रकार हा तळागाळातल्या लोकांसाठी झटणारा असावा. सर्वांच्या प्रश्नांना न्याय देणारा असावा. तर, समाजात घडणार्‍या घटना लोकापर्यंत पोहोचतील, असे मत चर्चासत्रात वरिष्ठ पत्रकारांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड एडिटर्स गिल्डच्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी कायदा या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यामध्ये दैनिक ‘पुढारी’ पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी, वरिष्ठ पत्रकार मंदार फणसे, सम्राट फडणीस, शीतल पवार, कमलेश सुतार, अविनाश थोरात, अमित मोडक, संजय आवटे, संदीप महाजन आणि महेश तिवारी सहभागी होते.

पत्रकार हा कुठल्याही एका समाजहितासाठी झटणारा नसावा तो व्यापक जनहिताच्या दृष्टीने प्रश्न मांडणारा असावा. विश्लेषक, शिक्षित, जाणकार हे तीनही गुण त्यामध्ये समाविष्ट असावेत. सामान्याच्या व्यथा, मांडून शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणारा असावा, असे मत चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. यांसारखेच पत्रकारितेमधून सामान्यांचे प्रश्न मांडणारे आणि सामाजिक सलोखा जपणारे कमलेश सुतार, अनिल म्हस्के, अमित मोडक, संदीप महाजन, अविनाश खंदारे, अश्विनी सातव-डोके, नितीन पाटील, महेश तिवारी, तुषार तपासे, सागर सुरवसे व गोविंद वाकडे आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पत्रकारांमध्ये दैनिक ‘पुढारी’चे विशेष प्रतिनिधी आशिष देशमुख यांचा सत्कार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे-अहमदनगर रस्त्यावरील भारतीय हवाई दलाच्या जागेवर फॉरेस्ट पार्क नावाच्या कॉलनीचा वाद हवाई दलासोबत सुरू होता. हा शंभर ते दिडशे एकरचा परिसर संरक्षित झोन असताना, येथे कुठल्याच बांधकामाला परवानगी नव्हती. मात्र काहींनी जागेचा परस्पर ताबा घेत या जागेची खरेदी-विक्री पसतीस ते चाळीस लाख रूपयांना केली. यामध्ये काही मनपाचे आणि महावितरणचे तसेच इतरही कार्यालयाचे अधिकारी असल्याने कारवाई होत नव्हती. मात्र, देशमुख यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे स्वतः ग्राहक बनत हे बिंग फोडले.

हेही वाचा

निर्यात शुल्कामुळे कांदा गडगडला ; कांदा खरेदीबाबत व्यापार्‍यांकडून हात आखडता

वाल्हे : शिवतारेंच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे

श्रीरामपूर : आयोगामुळे देशीगायी संवर्धनास मदत होणार : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Back to top button