श्रीरामपूर : आयोगामुळे देशीगायी संवर्धनास मदत होणार : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे | पुढारी

श्रीरामपूर : आयोगामुळे देशीगायी संवर्धनास मदत होणार : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशीवंश जातीच्या गायींच्या संवर्धनाचे काम पुढे नेण्यास मदत होईल असे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राज्य गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे सुपूत्र शेखर मुंदडा यांची निवड झाल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.च त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अक्षय महाराज भोसले, आचार्य महेश व्यास, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सरचिटणीस नितीन दिनकर, नंदूशेठ राठी, नानासाहेब पवार, गणेश राठी, प्रकाश राठी, डॉ. रविंद्र कुटे, डॉ. के. डी. मुंदडा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, शेखर मुंदडा यांच्या सारख्या कार्यकर्त्याला आयोगाचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. हा आयोग स्थापन करण्याचे भाग्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन मंत्री म्हणून मला मिळाले. आयोगाच्या माध्यमातून गोमातेची सेवा करण्याची मोठी संधी आहे. गोमाता सांभाळणे तेवढे सोपे नाही. अनेकांनी या आव्हानांवर मात करून गोमातेची सेवा करत आहे, ही सेवा एक प्रकारे लक्ष्मीची पूजाच आहे.

देशी वंश जातीच्या गायींचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशात पंतप्रधान मोदी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय आयोगा प्रमाणे राज्यातही आयोग काम करेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. सत्कारमुर्ती शेखर मुंदडा यांची राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून झालेली निवड गोमातेची सेवा करण्यासाठी झाली आहे. कसायाकडे गाय न देता आमच्या गोशाळेत द्या, असे आवाहन केले. पुणे येथिल कार्यकर्त्यासह जिल्हाने सत्कार केल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले. तसेच गीता, गुरू, गोविंद व गोमाता या सुत्रानुसार काम करीत असल्याचे मुंदडा म्हणाले.

यावेळी आचार्य महेश व्यास, धर्मवीर प्रशाळेचे व्यवस्थापक अक्षय महाराज भोसले, माजी आ. भानुदास मुरकुटे, मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, दर्शन मुंदडा, संचित भट्टड आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी रामविलास मुंदडा, एमआयडीसी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, अविनाश कुदळे, पुरुषोत्तम झंवर, डॉ. कांतीलाल मुंदडा नानासाहेब पवार, प्रकाश चित्ते, विठ्ठलराव राऊत, मारुती बिंगदे, शरद नवले आदींस माहेश्वरी समाज, मेडिकल असोसिएशन, महा. एन.जी.ओ फेडरेशन व आर्ट ऑफ लिविंगचे पदाधिकारी उपस्थित होते.

झंवर व बिहाणी यांचा गौरव

आचार्य महेश जी व्यास यांनी आपल्या भाषणात बेलापूर येथील गोशाळा अनेक वर्षापासून चालवली जाते यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले मात्र विमलताई झंवर व नगरसेवक व श्रीनिवास बिहानी यांच्या विषयी सहकार्याने आम्ही गोसेवा करू शकतो याबाबतचे गौरव उद्गार काढले त्यास उपस्थित त्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

हेही वाचा

बीड : पावसाअभावी सोयाबीन पीक करपू लागले; शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे

नेवाशात ‘जनसेवेचा यज्ञ’ चालूच ठेवणार : आमदार शंकरराव गडाख

श्रीरामपूर : रंधा धबधब्यामध्ये बुडून तरूणाचा मृत्यू

Back to top button