मूक मोर्चातून असंतोष ! डॉ. दाभोलकरांना अभिवादन | पुढारी

मूक मोर्चातून असंतोष ! डॉ. दाभोलकरांना अभिवादन

पुणे : बेपर्वा सरकार-धिक्कार धिक्कार, माणूस मारता येतो, विचार नाही, दहा वर्षे खुनाची-कार्यरत विवेकी असंतोषाची, असे फलक झळकावत कार्यकर्त्यांनी मूक मोर्चातून असंतोष व्यक्त केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या दहा वर्षांनंतरही आरोपींवर कारवाई होऊ न शकल्याने कार्यकर्त्यांनी मोर्चामध्ये सरकारच्या धिक्काराचे पोस्टर प्रदर्शित केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून एस. एम. जोशी सभागृहापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.

त्याअगोदर पुलावर स्मृतिजागर झाला. या वेळी गाणी, घोषणा आणि मनोगताद्वारे दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष माधव बावगे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे आणि विविध संस्था-संघटनांचे बहुसंख्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. गाणी, घोषणा, घोषवाक्यांच्या माध्यमातून विद्वेषाला प्रेमाने उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली.

हेही वाचा :

नाशिक : मखमलाबाद येथे सहा फुटी नागाचा रेस्क्यू

लडाखमध्ये शहीद जवानांना लष्करी सन्मानासह श्रद्धांजली वाहिली

Back to top button