लडाखमध्ये शहीद जवानांना लष्करी सन्मानासह श्रद्धांजली वाहिली | पुढारी

लडाखमध्ये शहीद जवानांना लष्करी सन्मानासह श्रद्धांजली वाहिली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 19 ऑगस्ट रोजी लडाखमध्ये सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना, फायर अँड फ्युरी कॉर्प्स कमांडर आणि सर्व श्रेणींनी पूर्ण लष्करी सन्मानासह आदरांजली वाहिली आहे.

लडाखमधील कियारीजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना आपला जीव गमावला. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या भीषण अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल सर्व स्तरातील व्यक्तींच्या वतीने शोक व्यक्त केला आहे.

लडाखमध्ये चीन सीमेला लागून असलेल्या न्योमा परिसरात शनिवारी रात्री लष्कराचे एक वाहन दरीत कोसळून त्यातील 9 जवानांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एक अधिकारी होते.

दरम्‍यान,  ही दुर्घटना क्यारी शहरापासून 7 किलोमीटर अंतरावरील कारू गॅरीसनलगत झाली. ताफ्यात एकूण 5 वाहने होती. ताफ्यातील अन्य वाहने एकापाठोपाठ थांबली व त्यांतील जवानांनी बचावकार्य सुरू केले होते. जवानांनी आपल्या सहकार्‍यांना दुर्घटनाग्रस्त वाहनाबाहेर काढले. दरीत कोसळलेल्या वाहनात 10 जवान होते. दरी अत्यंत खोल असल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढले.

-हेही 

भारतीय बाजारात संथ कारभार

दाभोलकरांच्या मोकाट मारेकर्‍यांना अटक करा ; अविनाश पाटील यांची मागणी

उत्तराखंड : देवदर्शनाहून येत असताना ५० फूट खोल दरीत बस कोसळली; ८ भाविकांचा मृत्यू

Back to top button