पुणे : पिंपरी-चिंचवडला मिळाले दोन उपायुक्त | पुढारी

पुणे : पिंपरी-चिंचवडला मिळाले दोन उपायुक्त

मुंबई : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधीक्षक/उपायुक्त पदावरील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयाने शुक्रवारी (दि.१८) जारी केले. या आदेशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दोन उपायुक्त मिळाले आहेत.

मुंबई येथील फोर्सवनचे अधीक्षक संदीप डोईफोडे आणि नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे कार्यरत असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक शिवाजी पवार यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button