भाटघर धरणात बुडालेल्या दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला | पुढारी

भाटघर धरणात बुडालेल्या दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला

भोर : पुढारी वृत्तसेवा :  भोर तालुक्याच्या भाटघर धरण बॅक वॉटरला असणाऱ्या वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड (ता.भोर) येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी ( वय 13 वर्षे )व शिरीष मनोहर धर्माधिकारी मुलगी आणि वडीलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून ऐश्वर्या हीचा मृतदेह सापडला होता, परंतु बेपत्ता असलेल्या शिरीष धर्माधिकारी यांचा मृतदेह बुधवारी ( दि. 16) सकाळी मिळून आला. मृतदेह भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी, (वय 13 ) व तिचे आईवडील तसेच इतर दोन मैत्रीणी व तिचे कुंटुबीय असे सुट्टी असल्याने जयतपाड (ता. भोर) सीमा फार्म येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारच्या 4 च्या सुमारास सीमा फार्म पाठीमागे असणा-या भाटघर धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी व तेथे असलेला धबधबा व बेबी पुल पाहण्यासाठी धरण्याचे कडेला हे सर्व गेले असता शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय-45 वर्षे) (रा. औंध पुणे) हे धरण्याच्या पाण्यात उतरले. त्यानंतर शिरीष यांनी ऐश्वर्याला खोल पाण्यात जवळ बोलावुन घेतले त्यांनंतर ऐश्वर्या व शिरीष मनोहर धर्माधिकारी असे दोंघे पाच ते सहा मिनिट खोल पाण्यात पोहत होते. त्यांनतर ते दोघे पाण्याचे बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते परंतु त्यांना बाहेर येता आले नाही व ते दोघे धरणाचे खोल पाण्यात ओढले गेले व थोड्या वेळाने पाण्यात बुडाले. एका पोहणा-या मुलाने ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी हिस पाण्याबाहेर काढले तेव्हा ती बेशुध्द पडलेली होती. त्यांनतर कारमधुन ऐश्वर्या हिस सरकारी दवाखाना भोर येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी हिस तपासुन ती मयत झाल्याचे सांगितले होते.

हेही वाचा :

राहुरीमध्ये कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नी आणि सासूची हत्या

सातारा : खांबाटकी बोगदा अडीच तास बंद; लोखंडी अँगल टेम्पोवर कोसळला

 

Back to top button