सातारा : खांबाटकी बोगदा अडीच तास बंद; लोखंडी अँगल टेम्पोवर कोसळला | पुढारी

सातारा : खांबाटकी बोगदा अडीच तास बंद; लोखंडी अँगल टेम्पोवर कोसळला

सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा खांबाटकी बोगद्यात लाईटचा अँगल टेम्पो क्रमांक KA/44/A/0525 वर तुटून पडल्याने टेम्पो चालक व्यंकटेश रंगाप्पा (वय 38) राहणार बेंगलोर, कर्नाटक हा जखमी झाला. टेम्पो रस्त्याच्या मधोमध अडकल्याने बोगद्यातील वाहतूक ठप्प झाली. सकाळी साडेसहा वाजल्‍यापासून नऊ वाजेपर्यंत बोगदा मार्गे वाहतूक बंद झाली. यामुळे ही वाहतूक खंबाटकी घाटातून पुणे बाजुकडे वळवण्यात आली. त्यामुळे सुमारे तीन तास वाहतुकीची कोंडी झाली.

अपघातग्रस्त टेम्पोवर पडलेला अँगल व टेम्पो क्रेनच्या साह्याने बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीतपणे चालू झाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस टॅबचे अधिकारी, कर्मचारी व खंडाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे जाणारी वाहतूक खांबाटकी घाटातून वळवण्यात आली. क्रेनच्या मदतीने टेम्पोच्या केबीनमध्ये अडकलेला अवजड अँगल बाजुला काढण्यात आला. अपघातग्रस्त टेम्पो बोगद्‍यातून बाहेर काढल्यानंतर वाहतूक बोगदामार्गे सुरु झाली.

खांबाटकी घाटातून पुण्याहून सातारा बाजुकडे जाणारी वाहतूक व विरुद्ध दिशेने येणारी (सातारा – पुणे) वाहतूक यामुळे खांबाटकी घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. दोन्ही बाजूला सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलीस एपीआय हर्षद गालींदे व त्यांचे सहकारी, खंडाळा पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस फरांदे व हवालदार वरे यांनी वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा :  

Back to top button