पुणे शहरातील शाळांच्या सुटीबाबत संभ्रम ! | पुढारी

पुणे शहरातील शाळांच्या सुटीबाबत संभ्रम !

पुणे : शहरातील मध्यवर्ती पेठांतील काही शाळांकडून मंगळवारी (दि.1) अण्णा भाऊ साठे जयंती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुटी दिली आहे. परंतु, शालेय शिक्षण विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. तर शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू राहणार असल्याचे पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्‍यानिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी सहा ते दुपारी तीन या वेळेत शहरातील रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने वाहतूक नियमन करण्यात येणार आहे.

सुटी देण्याची मागणी

शहरातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) रोजी सुट्टी द्या, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने करण्यात आली होती. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा

पुण्यात पंतप्रधानांचे स्वागत अन् बंदोबस्ताची कसोटी

अमरावती : लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक : चार तासांच्या थरारानंतर तडीपार गुंडाला अटक

Back to top button