अमरावती : लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू | पुढारी

अमरावती : लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : लोखंडी गेट अंगावर पडल्याने एका ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. आरव निलेश मालवे (३ वर्ष, रा. सोनल कॉलनी) असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. ही धक्कादायक घटना सोनल कॉलनीतील वक्रतुंड अपार्टमेन्टच्या ‍आवारात घडली.
आरव मालवे हा वक्रतुंड अपार्टमेंटच्या आवारात खेळत होते. दरम्यान तो आवारातील लोखंडी गेटवर चढला. त्यावेळी ते लोखंडी गेट आरवच्या अंगावर पडले. त्यामुळे त्याच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आरवला तत्काळ पीडीएमसीत दाखल केले. परंतू त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती ३० जुलै रोजी गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.

Back to top button