पिंपरी : पंतप्रधान आवास योजना : अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या; गव्हाणे यांची मागणी | पुढारी

पिंपरी : पंतप्रधान आवास योजना : अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या; गव्हाणे यांची मागणी

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्यावतीने आकुर्डी व पिंपरी येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची मुदत शुक्रवारी (दि.28) संपत आहे. नागरिकांना अर्ज सादर करताना द्यावयाच्या कागदपत्रांसाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे या योजनेतंर्गत अर्ज सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

अजित गव्हाणे यांनी सांगितले, की महापालिकेने आकुर्डी व पिंपरी येथील घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 28 जून ते 28 जुलै असा 30 दिवसांचा कालावधी दिला होता. अर्जासाठी विविध प्रकारच्या 10 कागदपत्रांची पूर्तता करण्याचे बंधन आहे. उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नोंदणीकृत भाडे करारनामा, अधिवास प्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रांसाठी नागरिकांना अधिक वेळ लागत आहे. ती कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिक अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात. नागरिकांना अर्ज करता यावा म्हणून आणखी 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा

मडगाव : सुळकर्णेच्या डोंगरावरून माती मिश्रित चिखलाचा ओघ; कुटुंबांचे स्‍थलांतर

लोणावळ्यातील धरणसाठ्यात वाढ; इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हिंजवडी : एकेरी वाहतुकीचा मार्ग खड्ड्यांतून

Back to top button