पाकिस्‍तानमध्‍ये भीषण अपघात : बस दरीत कोसळून २८ ठार | पुढारी

पाकिस्‍तानमध्‍ये भीषण अपघात : बस दरीत कोसळून २८ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बस दरीत कोसळून झालेल्‍या भीषण अपघातात २८ जण ठार झाले आहेत, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. मृतांमध्‍ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. बस तुर्बतहून बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टाला जात असताना क्वेट्टापासून सुमारे 700 किमी अंतरावर असलेल्या वाशुक शहराजवळ दरीत ही दुर्घटना झाली.

तुर्बतहून क्वेट्टाला जाणारी बस बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टापासून 700 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशुक शहराजवळ दरीत कोसळली. सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 22 जणांचा रुग्णालयात किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वळणावर प्रवासी बसचा टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे वाहन खोल दरीत कोसळले.

अति वेगाने घेतले २८ जणांचे बळी

बसचा वेग अधिक असल्‍याने हा अपघात झाला. जिओ न्यूजने बचाव अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, प्रवासी बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 22 जण जखमी झाले. पंजाबमधील खुशाब जिल्ह्यात १८ मे रोजी ट्रक खड्ड्यात पडल्याने एकाच कुटुंबातील १३ जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले होते. यापूर्वी 3 मे रोजी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये एक प्रवासी बस अरुंद रस्त्यावरून घसरून दरीत कोसळल्याने किमान 20 जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर 21 जण जखमी झाले होते.

 

Back to top button