स्मशानभूमीतील पंख्यांची चोरी : शेवाळेवाडी येथील प्रकार

स्मशानभूमीतील पंख्यांची चोरी : शेवाळेवाडी येथील प्रकार

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : शेवाळेवाडी येथील स्मशानभूमीत महापालिकेने काही दिवसांपूर्वी बसविलेल्या पंख्याची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली तसेच इतर इलेक्ट्रिक साहित्याची मोठी नासधूस करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. शेवाळेवाडी येथील स्मशानभूमी सर्व सुविधांयुक्त असावी, यासाठी शेवाळेवाडी ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी महापालिकेच्या माध्यमातून स्मशानभूमीत स्वछतागृह, रंगरंगोटी तसेच काही कामे स्वखर्चाने करून या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

वाढता उन्हाळा लक्षात घेऊन महापालिकेनेया स्मशानभूमीत सुमारे 40 पंखे बसविले. त्यातील आठ पंख्यांची चोरी झाली असून, इतर साहित्याची चोरट्यांनी नासधूस केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. शेवाळे म्हणाले की, पोलिसांनी तातडीने पंख्यांची चोरी करणार्‍यांचा शोध घ्यावा तसेच महापालिकेने स्मशानभूमीत चोवीस तास सुरक्षारक्षक नेमावा.

पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा

या प्रकाराबाबत राहुल शेवाळे यांनी हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील तसेच पोलिसांशी संपर्क साधून चोरीच्या प्रकाराबाबत तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकाराबाबत राहुल शेवाळे यांनी हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील तसेच पोलिसांशी संपर्क साधून चोरीच्या प्रकाराबाबत तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news