लोणावळ्यात 24 तासांत 273 मिमी पाऊस | पुढारी

लोणावळ्यात 24 तासांत 273 मिमी पाऊस

लोणावळा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळी 7 ते गुरुवारी सकाळी सात वाजेपर्यंतच्या 24 तासांत लोणावळा शहरात तब्बल 273 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे लोणावळ्यातील रस्ते जलमय झाले आहेत. शहरात मागील सलग तीन दिवस पावसाने 200 मिमी पावसाचा टप्पा ओलांडला आहे.

त्यामुळे यावर्षीच्या एकूण पावसाने दोन हजारी टप्पा पार केला असून, गुरुवारी (दि 20) सकाळअखेर एकूण 2017 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, केवळ मंगळवारी सकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंतच्या 72 तासांत 705 मिलीमीटर पाऊस पडला आहे.

पावसामुळे शाळांना दिली होती सुटी

  • गुरुवार सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे आणि महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केले आहे.
  • परिसरामध्ये सुरू असलेली अतिवृष्टी तसेच हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे लोणावळा नगर परिषद क्षेत्रातील सर्व शाळांना गुरुवारी (दि. 20) सुटी दिली होती. लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी पंडित पाटील आणि शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी अशोक पानसरे यांनी यासंदर्भात हा निर्णय जाहीर केला होता.

हेही वाचा

इंद्रायणी नदी सुधार योजनेचा डीपीआर अंतिम टप्प्यात

वेल्हे : बालवड पूल बुडाल्याने आठ गावांचा संपर्क तुटला

पिंपरी : नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत कर्मचार्‍यांनी काम करावे

Back to top button