पुणे : शस्त्रक्रियांमध्ये होतोय ‘एआय’चा वापर | पुढारी

पुणे : शस्त्रक्रियांमध्ये होतोय ‘एआय’चा वापर

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : सध्या बँकिंग, फायनान्स, आयटी, ऑटोमेशन अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंजिलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातही रुग्णांची तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रियामध्ये अद्ययावत एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. यामुळे अचूकता, सहजता, विश्वासार्हता मिळवण्यास मदत होत आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत अद्याप कमी जागरूकता असली तरी हळूहळू वापर वाढला आहे. भारतामध्ये एआयचा सर्वात जास्त वापर इमेजिंगमध्ये दिसून येतो. रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजीमधे निदान आणि चाचणीसाठी जास्त उपयोग दिसून येत आहे. पण आता शस्त्रक्रियांमध्येही वापर होण्यास सुरुवात झाली आहे.काही खासगी रुग्णालयांमध्ये सध्या रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजीसह प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये ‘एआय’चा वापर होत आहे.

कसा होतो ‘एआय’चा वापर?
डेटाचे विश्लेषण, सादरीकरण आणि आकलन
संशोधन आणि विकास
एआयच्या मर्यादा
आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात कृत्रित बुद्धिमत्ता हा मानवी मेंदूला पर्याय नाही
एआय केवळ खात्रीशीर मार्गदर्शक, रिप्लेसमेंट नाही

सह्याद्री रुग्णालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. स्ट्रोकच्या शस्त्रक्रिया आणि नवीन पद्धतीचा समावेश करायचा असल्यास हे सॉफ्टवेअर उपयोगी ठरते. सॉफ्टवेअरद्वारे शस्त्रक्रिया कधी करायची गरज आहे, याचा अंदाज घेण्यास मदत होते. डेक्कन रस्त्यावरील हॉस्पिटलमध्ये एक रोबो सुरू केला आहे. ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेमध्ये रोबो वैद्यकीय पथकास मदत करतो. सॉफ्ट टिश्यू आणि अवयव यांसाठीदेखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आम्ही लवकरच सुरू करणार आहोत.

– डॉ. सुनील राव, सीओओ, सह्याद्री हॉस्पिटल्स

वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रशिक्षण, उपचार पद्धतींमध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर माहितीच्या विश्लेषणासाठी केला जात आहे. एखादी गोष्ट सातत्याने करावी लागत असेल आणि त्यामध्ये 100 टक्के अचूकता हवी असेल तर मानवी मेंदूला मर्यादा येतात. अशा वेळी एआयचा प्रभावी वापर होतो. साथीच्या आजारांमधील डेटा संकलन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी एआयचा वापर होऊ शकतो.

– डॉ. श्रीकृष्ण जोशी, वैद्यकीय अधिकारी, लोकमान्य हॉस्पिटल

हेही वाचा

Ashadhi wari 2023 : माउलींची पालखी अलंकापुरीत; भक्तिमय वातावरणात आळंदीत आनंदोत्सव

ऊस दर नियंत्रण मंडळातून राजू शेट्टी, खोत, रघुनाथ पाटील यांना डच्चू

लोणी धामणी : पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात!

Back to top button