आखाडामुळे मासळी, मटण, चिकन खरेदीसाठी गर्दी | पुढारी

आखाडामुळे मासळी, मटण, चिकन खरेदीसाठी गर्दी

पुणे : देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंदीचा काळ संपला आहे. मात्र, अद्याप येथून अपेक्षित आवक सुरू झालेली नाही. सद्यःस्थितीत पूर्व किनारपट्टी असलेल्या हावडा, ओरिसा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या भागातून मोठ्या प्रमाणात मासळी बाजारात दाखल होत आहे. आखाडामुळे मासळीला मागणीही मोठी आहे. याखेरीज, चिकन, मटण व अंडीलाही मागणी चांगली आहे. आवक जावक कायम असल्याने त्यांचे दर टिकून आहेत.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 9) खोल समुद्रातील मासळीची 15 ते 12 टन, खाडी 100 ते 200 किलो, नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली. खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 1200-1500, मोठे : 900-1000, मध्यम : 700-800, लहान : 600-700, भिला : 600-700, हलवा : 800-900, सुरमई : 800-1200, रावस : 600-1000, घोळ : 700-800, करली : 360-400, करंदी : 200, पाला : 1500-1600, वाम : 600-700, ओले बोंबील : 200-280. कोळंबी : लहान 200-280, मोठी : 500-600, जंबोप्रॉन्स : 1200-1400, किंगप्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 1400-1500, मोरी : 250-400, मांदेली : 150-180, खेकडे : 280-320, चिंबोर्या : 480-550. तांबोशी : 440-480, पालू : 280-320, लेपा : 240-280, बांगडा : लहान 200 मोठा 240, शेवटे : 280-320, तिसर्या : 240, खुबे : 140, तारली : 160-180. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 360-400, शिवडा : 160-200, खवली : 160-200, आम्ळी : 120-140, खेकडे : 200-400, वाम : 550. मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 230, लेगपीस : 290, जिवंत कोंबडी : 150, बोनलेस : 320. अंडी : गावरान (शेकडा) 890, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 605, डझन 84, प्रतिनग 7.

Back to top button