पुणे : मासळीत स्वस्ताई ; इंग्लिश अंडी महागली | पुढारी

पुणे : मासळीत स्वस्ताई ; इंग्लिश अंडी महागली

पुणे : देशाची पूर्व किनारपट्टी असलेल्या हावडा, ओरिसा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या भागातून मोठ्या प्रमाणात मासळी बाजारात दाखल होत आहे. दरम्यान, मागणीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने मासळीच्या भावात वीस ते तीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. चिकन, मटण व इंग्लिश अंडी वगळता सर्वांचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत कायम आहेत. मागणी वाढल्याने इंग्लिश अंडी शेकड्यामागे 31 रुपयांनी तर किरकोळ बाजारात नगामागे 50 पैशांनी वाढल्याचे सांगण्यात आले.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 25) खोल समुद्रातील मासळीची 10 ते 12 टन, नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1500-1600, मोठे : 1200-1400, मध्यम : 900-1000, लहान : 700-800, भिला : 500-550, हलवा : 800-900, सुरमई : 800-1100, रावस : 800-1200, घोळ : 800-900, करली : 400-440, पाला : 1200-1500, वाम : काळी 300-400, पिवळी 700-800, ओले बोंबील : 200-250. कोळंबी : लहान 200-280, मोठी : 400-600, जंबोप्रॉन्स : 1200-1400, किंगप्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 1500-1600, मोरी : 300-400, मांदेली : 160-200, राणीमासा : 240-280, खेकडे : 300-320, चिंबोर्या : 480-600. नगली : 400-480, तांबोशी : 480-600, लेपा : 240-280, बांगडा : लहान 160 मोठा 200, बेळुंजी : 140-180, तिसर्या : 240, खुबे : 140, तारली : 180. नदीतील मासळी : रहू : 150-180, कतला : 160-200, मरळ : 360-400,खवली : 200-240, आम्ळी : 120-140, खेकडे : 360-400, वाम : 480-500. मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 240, लेगपीस : 290, जिवंत कोंबडी : 180, बोनलेस : 330. अंडी : गावरान (शेकडा) 890, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 601, डझन 84, प्रतिनग 7.

Back to top button