वडगावमध्ये भाजपचे ‘घर घर संपर्क ’ अभियान | पुढारी

वडगावमध्ये भाजपचे ‘घर घर संपर्क ’ अभियान

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यात मोदी9 हे अभियान राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत तालुक्यात राबविण्यात येणार्‍या ‘घर घर संपर्क’ या अभियानाचा प्रारंभ वडगाव शहरामध्ये बुधवार (दि.. 21) करण्यात आला. भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहराध्यक्ष अनंता कुडे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण भिलारे, रविंद्र म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर, गणेश भेगडे, संभाजी म्हाळसकर, कुलदीप ढोरे, अमोल धीडे, नितीन कुडे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे आदींच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या माध्यमातून मागील 9 वर्षात मोदी सरकारने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत अंत्योदय हे ब्रीद घेऊन राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती घरोघरी पोहोचविण्याचे कार्य या अभियानांतर्गत केले जाणार असून त्याची सुरवात आज वडगाव शहरात करण्यात आली.

’घर घर मोदी’ अभियानाच्या माध्यमातून मावळ विधानसभा मतदार संघात 60 हजार नागरिकांना भेटून त्यांना मोदी सरकारच्या 9 वर्षातील लोककल्याणकारी निर्णयाची माहिती पत्रक वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी या वेळी बोलताना दिली.

यासाठी घर घर मोदी अभियानाच्या मावळ विधानसभा संयोजक पदी विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांची नियुक्ती केली असून पुढील 10 दिवसांमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडलातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक बूथ वरील किमान 200 नागरिकांना प्रत्यक्ष भेटून ही माहिती पत्रक वाटप करून मोदी सरकारने केलेल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून मावळ भाजपा करणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

हेही वाचा

’क्रीम’ पोस्टिंगसाठी नवीन तरुण अधिकार्‍यांना घाई

वाल्हे: दूध व्यवसाय आला अडचणीत ; दुधाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र

 

Back to top button